भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूचरी खेचरी चांचरी निश्चळा । अगोचरी डोळा स्थिरावली

bhuchari khechari chanchari nishchala | agochari dola sthiravali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूचरी खेचरी चांचरी निश्चळा । अगोचरी डोळा स्थिरावली ॥१॥ झांकिली समाधी संतसज्जनांनीं । तुलसी पुष्पें वरूनि वर्षताती ॥२॥ निवृत्तीची मिठी विठोबाच्या गळां । आणिकांच्या डोळां अश्रू येती ॥३॥ केलें समाधान विठ्ठल रखुमाईनें । निवृत्ति म्हणे राहणें काय आतां ॥४॥ गेले योगिराज राहिले ठायीं ठायीं आतां मुक्ताई जाईल कीं ॥५॥ स्वरूपींचे ओघ जातील स्वरूपीं । नामा म्हणे निरोपी पांडुरंग ॥६॥