भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित

bhruvamadhyen tej chandrasuryavirahit

भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित । आदी मध्य अंत संचलेंसे ॥१॥ तुर्यारुपें ते सुषुम्ना प्रकाशली । नवविध अमृतजळीं तया तेजा ॥२॥ ज्ञानदेव वदे अष्टांग योग साध । पावाल ब्रह्मपद याचा भेद ॥३॥