भजनी मालिका
← भजनांकडे परत

भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी

bhrungichiya angin konaten ho bal | shariren anadhal keli ali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥ काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥ अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥ नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥