भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रांति माझें मन प्रपंची गुंतलें श्रवण मनन होऊनी ठेलें

bhranti majhen man prapanchi guntalen shravan manan houni thelen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भ्रांति माझें मन प्रपंची गुंतलें श्रवण मनन होऊनी ठेलें ।।१।। बायें बोधिलें बायें बोधिली। बोधुनी कैसी तद्रूप झाली ||२|| निजध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरूपीं देखिला बाईयांनो ।।३।। नामयाची जनी स्वयंबोध झाली अवघाचि पुसिला ठाव देखा ॥ ४॥