भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या

bhola majha pandharinath | dhanven tvarit pacharilya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥ न पाहे मानप्रतिष्ठा त्याची । घेतली ज्याची सुति येणें ॥२॥ अनाथें दिनें भाविकें तें । आवडती चित्तें जीवापरी ॥३॥ निळा म्हणे पाळी लळा । अख्ंड सोहळा करुनियां ॥४॥