भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग

bhogavati tirin didhala mandap | sadhu aparup pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग ॥१॥ रखुमाई राही वैसल्या अनेक । सखा पांडुरंग उतरला ॥२॥ वद्य मार्गशीर्ष दशमी जागर । हरिदिनीं गजर कीर्तनाचा ॥३॥ क्षेत्रप्रदक्षिणा केली असे संतीं । आले भोगावती अवघेजन ॥४॥ निवृत्ति मुक्ताई दुश्चित्त अंतःकरण । साहित्य नारायण करीतसे ॥५॥ नामा म्हणे देवा आधीं नेमा स्थळ । मग हें सकळ साहित्य करूं ॥६॥