भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी

bhid bhid jay udoni launkik | shevatincha rank tohi dapi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥ दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥ सुहदजन ते अवमान करिती । निष्ठुर बोलती त्रासवंचनें ॥३॥ निळा म्हणे मग होय दैन्यवाणें । हो काय तैसें जिणें भूमिभार ॥४॥