भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें

bhetilagin majha phutatase pran | kaya vacha manen jivembhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥ संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदाअ ॥३॥ सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥