भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटावया भक्तजनां । उभाचि राणा पंढरीचा

bhetavaya bhaktajanan | ubhachi rana pandharicha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भेटावया भक्तजनां । उभाचि राणा पंढरीचा ॥१॥ अवलोकितो दिशा चारी । येती वारकरी ज्या पंथें ॥२॥ आलियाचा राखें मान । करीं समाधान यथाविधि ॥३॥ निळा म्हणे दोषा खंड । चुकवी दंड यमाचा ॥४॥