भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटवाल पंढरीनाथ । तुम्हीचि संत कृपाळु

bhetaval pandharinath | tumhichi sant krupalu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भेटवाल पंढरीनाथ । तुम्हीचि संत कृपाळु ॥१॥ म्हणोनि येतों काकुळती । पुढतोंपुढती कींव भाकीं ॥२॥ इतरांची मी न करीं आस । झालों दास तुमचाची ॥३॥ निळा म्हणे ठेवा पायीं । यावरी कायी विनवूं मी ॥४॥