भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें

bhet dein maj hmane baliram | na varnave prem akrurachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें ॥१॥ पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हां । कोणरे हा बावा आला येथें ॥२॥ आपुल्या कान्होबाच्या पायां कां पडतो । काय हा मागतो सांग आह्मां ॥३॥ अक्रूर बळिराम घरीं आले गोपाळ । मंदादि सकळ भेटीयेले ॥४॥ मधुपर्कविधि करीती पूजन । ह्मणे धन्य दीन आईचा हा ॥५॥ अक्रूराबरोबरी करिती भोजन । पुसे वर्तमान मग त्यासी ॥६॥ भक्त माझें दैवत जगा दावी मात । कृपाळु बहुत नामा ह्मणे ॥७॥