भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी

bhavikachen avaghenchi god | karuni kod svikari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥१॥ भोळा नाथ पंढरीचा । न करी दासाचा अतिक्रम ॥२॥ न म्हणे रुक्ष थोडें कांही । घाली अवघेंही मुखींचि तें ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । उभा तिष्ठत विटेवरीं ॥४॥