भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेंविण भक्ति कशानें हो करी । माया मोह वैरी देहामाजीं

bhavenvin bhakti kashanen ho kari | maya moh vairi dehamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भावेंविण भक्ति कशानें हो करी । माया मोह वैरी देहामाजीं ॥१॥ तुझें नाम दिव्य रस जिव्हे स्वाद । नाश काम क्रोध करिती माझा ॥२॥ जे जे वस्तुसि नयनीं मी पाहे । त्या त्या धांवताहे विषयीं मन ॥३॥ नामा म्हणे थोर उबगलों संसारीं । पुढा काळ वैरी ग्रासूं पाहे ॥४॥