भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधुचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं

bhavasindhucha par taravayalagin | sadhan kaliyugin anik nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवसिंधुचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं ॥१॥ अहनिंशीं नाम जपा श्रीरामाचें । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥ न चले वर्णाश्रम धर्म आचरण । न घडे व्रत दान तप कोणा ॥३॥ नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण । नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध ॥४॥ नव्हे ध्यान स्थिती भावेंविण वोजा । न घडे देवपूजा एकनिष्ठ ॥५॥ नामा म्हणे नाम राघोबाचें गातां । ब्रह्म सायोज्यता घर रिघे ॥६॥