भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा

bhavasindhu taraya ekachi upay | dhyave tujhe pay vasudeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा ॥१॥ गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥२॥ नारायण नारायण करी जो पारायण । तो उद्धरे जाण इहलोकीं ॥३॥ तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवा उद्धरणा नाम स्मरा ॥४॥ अहर्निशी कीर्ति गाती भाविक भोळे । त्यांनीं तुज जिंकिलें ब्रह्मा म्हणे ॥५॥ नामा ह्मणे ऐसें दाविलें सुगम । नलगे तुह्मा नेम नाना कोटी ॥६॥