भजनी मालिका
← भजनांकडे परत

भला तूं हरी कळलासी रडीवाला ॥धृ

bhala tun hari kalalasi radivala ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भला तूं हरी कळलासी रडीवाला ॥धृ०॥ विधीचें अक्षर खरें हें असतां । अजासुताचे कां जाले हाल ॥१॥ पाराशरसुत वरचढ जाला । म्हणून कां त्वां फुगविले गाल ॥२॥ बळीनें तुज पाहे खरीद केलें । खर्चून तो धनमाल ॥३॥ नामा मनीं निर्भय गुरुवर कृपे । तुजलागीं देतो हे प्रतिख्याल ॥४॥