भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिं भावचि बांधिला गांठी । आला उठाउठीं देव तेथें

bhaktin bhavachi bandhila ganthi | ala uthauthin dev tethen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तिं भावचि बांधिला गांठी । आला उठाउठीं देव तेथें ॥१॥ म्हणे मज घ्या सोडायसी । ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥२॥ लटिकीच माया धरिशील रुपें । लपशील खोपें रिघोनियां ॥३॥ न सोडूं भाव जांई तूं आतां । विनवी देवभक्तां काकुळती ॥४॥ भावही घ्यारे भक्तिही घ्या रे । मजही घ्यारे तुमचाचि मी ॥५॥ निळा म्हणे साधिलें काज । भक्तिं आपुली पैज जिंकियेली ॥६॥