भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिचिया चाडा गोकुळाशीं आला

bhaktichiya chada gokulashin ala

भक्तिचिया चाडा गोकुळाशीं आला । त्याशी गौळणी म्हणती वाल्हा दुल्हागे माये ॥ आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुरवाडे । त्याशी गौळणी खेळविती लाडे कोडेंगे माये ॥१॥ गोजरिया कान्हो अपछंद मत्ता पाउली रंगे रंगनाथ । दृष्टीचिया डोळां सुख निवडेना मागुतें ते वाचा वर्णावी केंवि आतां रया ॥ध्रु॥ अठुले लोळिया ढाळ देती कानीं मुक्तें खेवणी हरि श्रवणीं ॥ अंतरिचिया सुखा प्रगट दाविती देखा । ललाटीं झळकती रेखा रत्न जडित पत्रें माथांगे माये ॥२॥ युगबंदु दिधला तैसा दोंदिलु मिरवला । नाभिकमळीं प्रकाश जाला परमेष्टी ॥ कटितटीं कडदोरा साजे त्या सुंदरा । वेगु तरु नेपुरां वेदु मानसीं वसेगे माये ॥३॥ श्रुतिचेनि समागमें पाउलें गोजिरीं । घागुरली प्रेम नेपुरें कैसी वोप देती ॥ अंदु वाकी वाळे पाय करी बेंबिले । मुनिजनांचे सुखसोहळे पुरवितसे गे माये ॥४॥ ऐसा अपुलिये लीळे आपणासींच खेळे । गौळणी भरुनियां डोळे कैशा पाहाताती ॥ अवघें कृष्णरुप भरलेंसे मानसीं । बापरखुमादेविवरेंसी मिळोनि गेल्यागे माये ॥५॥