भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति त्रिविधा षड्‌विध नवविधा । यजन याजनें जीवातें दंडिताती सदा

bhakti trividha shad‌vidh navavidha | yajan yajanen jivaten danditati sada

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्ति त्रिविधा षड्‌विध नवविधा । यजन याजनें जीवातें दंडिताती सदा ॥१॥ केशव परमात्मा नेणोनि याजी पतितें । पतनीं पडतां होती भूतें रया ॥२॥ नाहीं रूप स्थिति नाहीं शब्दस्थिति । नित्य तया वस्ती निरंजनीं ॥३॥ एकलें परब्रह्म गुरुमुखें जावावें । तरि चुकवावें पुनरावृत्ति रया ॥४॥ ऐसें रे नामया वचन ऐक पुढें । हे तो देवाविषयीं श्रुतीचे निवाडे ॥५॥ श्रुती नेती परतोनि आलिया । खेचर पुढें सांगे नामया ॥६॥