भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति करुनियां कोण वायां गेला । सांगा हो विठ्ठला निवडुनि

bhakti karuniyan kon vayan gela | sanga ho viththala nivaduni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्ति करुनियां कोण वायां गेला । सांगा हो विठ्ठला निवडुनि ॥१॥ द्वापाराचे अंती नामची सुकृत । अद्यापि निश्चित चालतसे ॥२॥ नाम ऐकतां तरती निर्धारीं । व्याख्यान श्रीधरी टीकाकार ॥३॥ नामा म्हणे राम व्यापीं त्रिभुवन । नाम तें निधान कलियुगीं ॥४॥