भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें

bhakti henchi bhan parabrahma pakvanna | gurumukhen jevan yeviyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें ॥१॥ अनुभव भात लयालक्ष कढी । जेवणारा गोडी घेत असे ॥२॥ सुखशांति शाखा भावर्थ हा वडा । जेवणार गाढा आत्माराम ॥३॥ दया क्षीरधारी शांती पूर्णपोळी । घृत हें कल्होळी प्रेम माझें ॥४॥ विषयाचा गुरळा थुंकोनी सांडिला । नामा आंचवला संसारासी ॥५॥