भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताचिया भावा होऊनि ऋणायितु । उभा असे तिष्ठतु पंढरिये

bhaktachiya bhava houni runayitu | ubha ase tishthatu pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्ताचिया भावा होऊनि ऋणायितु । उभा असे तिष्ठतु पंढरिये ॥१॥ महाद्वारींची हे तळींची पायरी । तो वैकुठावरी कळस केला ॥२॥ भूतळींचे वैभव कायसें बापुडें । बोलतां लाज पडे देवराया ॥३॥ त्या सुखाची नव्हाळी कैंची रसातळीं । बोलतां बोबडी जिव्हा पडे ॥४॥ म्हणोनि पांडुरंग मौनचि राहिला । नाम्यानें धरिला दोन्हीं चरणीं ॥५॥