भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताचांचि वोरस देवा धांवे सेवा करुं त्यांची

bhaktachanchi voras deva dhanve seva karun tyanchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्ताचांचि वोरस देवा धांवे सेवा करुं त्यांची ॥१॥ जें जें गोड वाटें मनीं । तें तें वदनीं भरीं तयां ॥२॥ अपूर्ण तेथें पूर्ण करी । पुरवी कामारी होउनी ॥३॥ निळा म्हणे रक्षी हेत । उभा तिष्ठत त्यांपाशीं ॥४॥