भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ता पुंडलिका देखोनि निकटा । आलासी वैकुंठा-हूनि आजी

bhakta pundalika dekhoni nikata | alasi vaikuntha-huni aji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्ता पुंडलिका देखोनि निकटा । आलासी वैकुंठा-हूनि आजी ॥१॥ नारद वचन ऐकोनियां मनीं । सुखें चक्रपाणी सुखावला ॥२॥ सुखरूप सदा देव दुरी ठेला । मुनीश्वर काला स्वयें दावी ॥३॥ नामा ह्मणे तुज भक्ति पिसें फार । साधिलें नगर क्षणमात्रें ॥४॥