भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त प्रल्हादाकारणें । त्या वैकुंठींहूनि धांवणें

bhakta pralhadakaranen | tya vaikunthinhuni dhanvanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्त प्रल्हादाकारणें । त्या वैकुंठींहूनि धांवणें ॥१॥ नरहरी पातला पातला । महा दोषा पळ सुटला ॥२॥ शंख चक्र पद्म गदा नाभीं नाभींरे प्रल्हादा ॥३॥ दैत्य धरी मांडीवरी । नखें विदारी नरहरी ॥४॥ पावला गरुडध्वज । नामया स्वामी केशवराज ॥५॥