भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती

bhakta jen jen karma kariti | ten tun hosi krupamurti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥ हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥ वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥ धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी म्हणे भला ॥४॥