भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढें

bhakta bhagavat bahusal aikile | bahu houni gele hoti pudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढें ॥१॥ परि नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व । हा रस अद्‌भुत निरुपमु ॥२॥ हे सुखविश्रांति नाहीं हो कल्पांतीं । विचारावें संतीं दूरदृष्टि ॥३॥ होतू शास्त्रवक्त्ते व्युत्पत्तीचे माथे । होतू बहु श्रोते बुद्धिवंत ॥४॥ होतू कर्मनिष्ठ विधीचे उद्‌भट । होतू सर्वश्रेष्ठ पूज्य लोकां ॥५॥ होतू कलावंत कवित्व कुशल । होतू का वाचाळ चतुरतेचे ॥६॥ होतू कां पाठक होतू कां साधक । होतू कां वाचक ग्रंथकार ॥७॥ होतू आत्मज्ञानी होतू निजध्यानीं । होतू कां विरक्तत सर्व संगीं ॥८॥ होतू योगयुक्त होतू जीवन्मुक्त । होतू कां विरक्त सर्व संगीं ॥९॥ ऐसे होतू का सभाग्य संपन्न सर्वज्ञ । परि मी न मनीं तुजविण विष्णुदासा ॥१०॥ हे खूण जाणताम एक पंढरीरावो । रुक्मादेवी नाहो श्रीविठठल ॥११॥