भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यहीन व्दाड । तया बुध्दि करी नाड

bhagyahin vdad | taya budhdi kari nad

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाग्यहीन व्दाड । तया बुध्दि करी नाड ॥१॥ सुख तें सन्मुख । तया तेंचि भासे दु:ख ॥२॥ हित अनहितावरी । देखोनियां पळे दुरी ॥३॥ निळा म्हणे उफराटे । प्राक्तन होऊनियां भेटें ॥४॥