भजनी मालिका
← भजनांकडे परत

भगवंताचे भक्तीसाठी

bhagavantache bhaktisathi

रचनाकार: संत रामदास · अभंग
भगवंताचे भक्तीसाठी। थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण । तेंचि भागीरथीचे स्नान सकळ लोकांचे भाषण। देवासाठीं संभाषण जें जें हरपलें सांडले । देवाविण कोठें गेलें जठराग्नीस अवदान। लोक म्हणती भोजन एकवीस सहस्त्र जप। होतो न करितां साक्षेप दास म्हणे मोठें चोज। देव सहजीं सहज।