भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें बरवें बाळ कोडीसवाणेरे । यशोदा म्हणे दृष्टी होईल बारे

baraven baraven bal kodisavanere | yashoda mhane drushti hoil bare

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बरवें बरवें बाळ कोडीसवाणेरे । यशोदा म्हणे दृष्टी होईल बारे ॥१॥ बरवी बरवी डोळस सांवळी । कोण उतरोनी हरीची पाउली ॥२॥ चंदन पोटाळा कांसे सोनसळा । विष्णुदास नामा चरणाजवळी ॥३॥