भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवा झाला वेवसाय । चित्तीं आठवितां पाय

barava jhala vevasay | chittin athavitan pay

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरवा झाला वेवसाय । चित्तीं आठवितां पाय ॥१॥ राम ह्रदयीं राहिला । परमानंद प्राप्त झाला ॥२॥ व्दैत तेंहि मावळलें । परब्रम्ह प्रकाशलें ॥३॥ निळा म्हणे धन्य झालों । गुरुकृपें स्थिरावलों ॥४॥