भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळका स्तनपान करविते माता । टाळितां परता चरणीं लोळे

balaka stanapan karavite mata | talitan parata charanin lole

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळका स्तनपान करविते माता । टाळितां परता चरणीं लोळे ॥१॥ हातीं घेऊनि शिपटीं माय लागे पाठीं । चरणीं घाली मिठी परते नोहें ॥२॥ तैसें माझें मन तुजलागीं देवा । न विसंबे केशवा क्षनभरी ॥३॥ चातक तेथें पाणी तृषाक्रान्त वनीं । वाट पाहे गगनीं जीवनाची ॥४॥ निराळेंचि पीयुष वर्षे तयालागीं । आळवितां वेगीं मेघराया ॥५॥ वाललें हें तृन नसंडी हो क्षीर । तैसें भक्तीं स्थिर मन राहे ॥६॥ नामा म्हणे या जन्माचिया साठीं । चरणीं घाली मिठी परता नोहे ॥७॥