भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाल वृद्ध तरुण काया हे जर्जर । वेगीं हा पामर आळशी झाला

bal vruddha tarun kaya he jarjar | vegin ha pamar alashi jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाल वृद्ध तरुण काया हे जर्जर । वेगीं हा पामर आळशी झाला ॥१॥ काय करूं देवा नाहीं यासि भावो । न करी हा उपावो तुझ्या भजनीं ॥२॥ मन ठेवीं ठायीं रंगेम तूं श्रीरंगीं । गोष्टी त्या वाउगी बोलूम नको ॥३॥ नामा म्हणे श्रीरंगु चित्तीं पां चोखडा । उघडा पवाडा सांगितला ॥४॥