भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें

baisala hota patavari | tochi thararila te avasarin | nisatoniyan prushthivari baisala | avachita nighaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें ॥१॥ वढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥ मग म्हणे धावां धावां । याचिये हातींचे मज सोडवा । नडलों आपुल्या कापटयभावा । नाही स्मरलों चांडाळा ॥३॥ अचेतन हे धांवती काष्ठे । लक्षानुलक्ष कोटयानुकोटें । आतां कैंचे जिणें येथें अदृष्टें । मारावया आणिलें ॥४॥ लोक हांसताती भोंवताले । म्हणती कैसें हें नवल झालें । आमुचेही पाट येथें आले । मारुंचि बैसले माभळभटा ॥५॥ येथें न चले कोणाचेंचि कांहिं । ईश्वरइच्छेची हे नवाई । ब्राम्हण म्हणोनी सोडिला पाहिं । नागवा उघडा माभळभट ॥६॥ निळा म्हणे लवडसवडी । पळतां भूई त्या झाली थोडी । येऊनियां कंसाचिये देवडीं । शंखस्फूरणे उभा ठेला ॥७॥