भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळा

bahutadan var‍hada alesi bala

बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळा । हांसती लोक परी न संडी चाळा ॥१॥ एकाचें खाये एकासि गाये । लाज नाहीं तिसी सांगावे काये ॥२॥ वर्‍हाडियांच्या भुलली सुखा । सुख भोगितां पावली दु:खा ॥३॥ नाथिलें पुसे भलत्यासि रुसे । जयाचें लेणें लेऊनि थोर संतोषें ॥४॥ क्षणाचा सोहळा मानिलें हित । आपस्तुति परनिंदेचें गीत ॥५॥ कवणाचें वर्‍हाड भुललीस वायां । शरण रिघें रखुमादेविवरा नाह्या ॥६॥