भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी

bahiju bhitari bhitaralepana uri

बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी । ऊरी ऊरैल साचारी जेणें निवविजे ॥ तेथचिया सारा मुसें मुसल्या आकारा । सोय सांडु नको येरझारा चुकतील ॥१॥ सहज भक्तिसुख पावसील । जाणु असतां काम नेणु होतासी । मागिली ये तुटी साठीं । लाभु ये खेपेचा मनुष्यपणाचेनि मापें घेइजेसु रया ॥२॥ येकवटु वटवटाच्या पोटीं । बिजीं बिजा आंतवटु आपण पैं । तिहीं रजीं रजु सरे सरोनियां जें उरे । तैसें एकसरां धुरें तूं अनुसरे पां ॥३॥ रविरश्मीचिया तेजा कवण बैसविलिया वोजा । कैशा सांगताति गुजा सामवलेपणें ॥ जळीं तरंगु तैसा परमात्मा परमानंदु । ऐसा सांडूनि गोविंदु झणें विलया जासी ॥४॥ जळें जळ पियींजे तेथें काय उरे दुजें । ओघें ओघुचि गिळिजे बाप सागरा पोटीं ॥ सिंधु नेणे अव्हांटा नदीचिया वाटा तैसा करीलरे हरि सांठा तुज आपणामाजी ॥५॥ तेथे जगचि परतलें जग जगपणा मुकलें । मोहो अभावीं उरलें उरतां ठायीं ॥ तेथें सिंधुचि अवघा अवघेपणें नये मागा । यापरी लागवेगी हरि पावसी रया ॥६॥ ऐसे सुखाचे सोहळे माजी सुख प्रेमवोळे । कवण सुख बोले सुख सुकाळे मातलें तें ॥ तेथें मीतूं सरे सेखीं भक्त तोही नुरे । शिवीं शिव विरे मोहरे जालया रया ॥७॥ अमृतीं अमृता गोडी बोल बोलतां बोबडी । पुण्य मनोधर्मी गुढी उभारिली जेणें ॥ अमरवोघाचेनि वोघे आफ़ाविजे जिवलगें । बापरखुमादेविवरा विठ्ठलांसंगें सांपडलें ॥८॥