भजनी मालिका
← भजनांकडे परत

अव्यक्त आकार अकारलें रूप

avyakta akar akaralen rup

अव्यक्त आकार अकारलें रूप । प्रकाश स्वरूप बिंबलेंसें ॥१॥ तें रूप अव्यक्त कृष्णनाम निज । नामाअधोक्षज चतुर्भुज ॥२॥ वर्णासी अव्यक्त वर्णरूप व्यक्त । भोगिती वरिक्त नामपाठें ॥३॥ निवृत्तिचे काज नाम मंत्र बीज । गयनी सहज तुष्टलासे ॥४॥