भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी

avatarachi rashi to ha ubha vitevari

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र- गदापद्मसहित करीं ॥१॥ देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे गे माये ॥२॥ सगुण चतुर्भुज रूपडें तेज पुंजाळती । वंदी चरणरज नामा विनवी पुढती गे माय ॥३॥