भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेलें पूर कौर-वांचें

avashya mhanoni chalila akrur | pahiyelen pur kaur-vanchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेलें पूर कौर-वांचें ॥१॥ धृतराष्ट्रा सांगे विवेकाच्या गोष्टी । फार तुझ्या पोटीं दुष्टबुद्धी ॥२॥ बंधूचिया पुत्रा धरितोसी दूर । होसी लोमापर पुत्रांवरी ॥३॥ करितोसी द्वेष पंडूच्या पुत्रांचा । होशील नरकाचा अधिकारी ॥४॥ स्वर्गींचे पूर्वज हांसतील तुज । धरावा उमज ग्रेथोनियां ॥५॥ सांगोनियां ऐसें येथूनि उठला । कुंतीसी भेटला नामा म्हणे ॥६॥