भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे

avaghen dekhe bramharup | gun dosh pap natale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे ॥१॥ त्याची झाली चित्तशुध्दी । कृपानिधी तोषला ॥२॥ हरीच्या भजनीं अत्यादर । पडेल विसर संसारें ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥४॥