भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा

avaghe nirantar kara ha vichar | bhavasindhupar tarije aisa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥ अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥ अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥ अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥ अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥ नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥