भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक

avaghachi sansar sukhacha karin | anande bharin tinhin lok

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥