भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघाची संसार सुखाचा करीन

avaghachi sansar sukhacha karin

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥ जाईनगे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा अपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन परब्रह्मीं ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाटी घेऊनि राहे ॥३॥