भजनी मालिका
← भजनांकडे परत

आउट हात आपुले आपण होतासी

aut hat apule apan hotasi

आउट हात आपुले आपण होतासी । येर तें सांडितासी कवणावरी । ऐसेंनि सांडिसी तरी थोडें तें सांडी । कां सकळैक मांडी तेणें सुखिया होसी रया ॥१॥ कळिकाळ ते आपण । प्रभा अनु कोण । करितां दीपें लाजिजे । घरामाजी घरकुल करुं पाहासी तें दैन्यचि वाउगें येर सकळैक तूं आहासी रया ॥२॥ पृथ्वी येवढा घडु लाघे यावा । मा गगन भरुं जावें अनाठायां । अस्ति नास्ति दोन्ही येकेचि पदीं । आकाशाची भरोवरी घटे केविं कीजे रया ॥३॥ धावतां धावतां वेगें । तुजचि तूं आड रिगे पाय खोंवितु खोंवितु मार्ग ठाके काई जासलट ज्या वाही त्याचि सवा पाहीं । वायां तूं हावे जासी रया ॥४॥ जागणेंन काय जन्मलासी निजेलेनि निमालासी । स्वप्नें कय केलासि तडातोडी । ऐसा जाणत नेणत तेथींचा तेथें आभासत असे तूंचि तूं भल तेथें रया ॥५॥ आपला आरोहणीं लाऊ पाहातोसि निशाणी । तरी सांगेन ते वाणी लाविजेसु । श्रीगुरुनिवृत्तिनाथा चरणकमळीं । पाखोवीण होय अलिया म्हणे ज्ञानदेव ॥६॥