भजनी मालिका
← भजनांकडे परत

अठ्ठावीस युगें उभा ठेला द्बारीं । पुंडलीकावरी ठेवुनि लक्ष

aththavis yugen ubha thela dbarin | pundalikavari thevuni laksha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अठ्ठावीस युगें उभा ठेला द्बारीं । पुंडलीकावरी ठेवुनि लक्ष ॥१॥ कृपेचा सागर भक्तजनवत्सल । आमुचा विठ्ठल माय- बाप ॥२॥ भक्तीसि भाळला अरूप रूपा आला । वेळाईंत झाला भक्तांलागीं ॥३॥ भक्तीचिया रूपें न घडे तें केलें । वैकुंठा आ-णिलें भूमंडळीं ॥४॥ भक्ति मुक्ति सिद्धि त्यापायीं लागती । उ-द्धट गर्जती विठ्ठलनामें ॥५॥ नामा ह्मणे केशव उदाराचा राव । सेवा चरणीं ठाव देईं आह्मां ॥६॥