भजनी मालिका
← भजनांकडे परत

अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना

athava vinanti parisa deva | maj ya nirava santajana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना ॥१॥ राहेन त्यांचिया सहवासेसी । सेवा मिरासी करुनिया ॥२॥ देतील तो सेवीन ग्रास । होईल सपोश तेणें तनु ॥३॥ निळा म्हणे ते सांगती गोष्टी । धरीन कर्णपुटीं अर्थ त्यांचे ॥४॥