भजनी मालिका
← भजनांकडे परत

अठरा दिगांतीहुनि पाळणा आणिला

athara digantihuni palana anila

अठरा दिगांतीहुनि पाळणा आणिला । तेथें एक निर्गुण बाळ पहुडला ॥१॥ बाळापें हें नाहीं बाळापें हें नाहीं । अंगुष्ठ पेउनि घेई निरालंब ॥ध्रु०॥ निरालंबीं स्वाद आळवी ब्रह्मीं । तेथें एकु बाळ बोभाये निरंजनीं ॥२॥ बाप रखुमादेविवरु अनादि अंतीं । त्याहुनि परती मज गति केली ॥३॥