भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येऊनि सांभाळीं । केला माझा लळा पाळी

atan yeuni sambhalin | kela majha lala pali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां येऊनि सांभाळीं । केला माझा लळा पाळी ॥१॥ होशिल तूं कृपावंत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥ बाळकासी मोहे । नीति पाळाविसी आहे ॥३॥ निळा म्हणे आतां । नाही धीर माझया चित्तां ॥४॥