भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येतों स्वामी कृपा असो द्यावी तुम्ही

atan yeton svami krupa aso dyavi tumhi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आतां येतों स्वामी कृपा असो द्यावी तुम्ही ॥१॥ बहु दिवस सांभाळ केला पुन्हां जन्म नाहीं दिला ॥२॥ थोर सुकृताच्या राशी तुमचे पाय मजपाशीं ॥३॥ ऐसा नामदेव बोले। ऐकोनी दासी जनी डोले ||४||