भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती

atan vat pahun kiti | deva rukmaichya pati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥ येई बेई पांडुरंगे। भेटी देई मजसंगें ॥२॥ मी बाबुडतें भवजळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥ राग न धरावा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥